Satyameva Jayate Government of Maharashtra · MAHARASHTRA STATE Gram Panchayat Bhimkhet ग्रामपंचायत भीमखेत

VBGRAMG

VB-G RAM G योजना 

1 जुलै 2026 पासून अंमलबजावणी

VB-G RAM G म्हणजे Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin).

विकसित भारत – रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) असे म्हणतात.

ही केंद्र सरकारची ग्रामीण भागातील रोजगार हमी आणि ग्रामीण विकासासाठीची नवीन योजना आहे. या कायद्याद्वारे पूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) जागी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणे, गावात कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्माण करणे आणि गावांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.

1. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

125 दिवस

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला रोजगाराची कायदेशीर हमी

₹300+

देशातील अधिसूचित दैनिक मजुरीचा किमान स्तर

1 जुलै 2026

योजना लागू होण्याची तारीख

ग्रामीण कुटुंब

पात्र प्रौढ सदस्यांना अकुशल कामाची संधी

मनरेगा आणि VB-G RAM G मधील प्रमुख फरक

बाब

मनरेगा

VB-G RAM G

रोजगार हमी

100 दिवस

125 दिवस

कामाचे स्वरूप

अकुशल मजुरीची कामे

रोजगारासह टिकाऊ विकासकामे

नियोजन

ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन

विकसित ग्रामपंचायत आराखडा

तंत्रज्ञान

MIS व डिजिटल नोंदी

डिजिटल, GPS, बायोमेट्रिक व AI आधारित देखरेख

उद्देश

रोजगार हमी

रोजगार व ग्रामीण पायाभूत विकास

2. या योजनेअंतर्गत कोणती कामे करता येतात?

या योजनेत प्रामुख्याने चार विषयांवर भर देण्यात आला आहे.

1. जलसंधारण व जलसुरक्षा

  • शेततळे, पाझर तलाव.

  • नाला खोलीकरण व रुंदीकरण.

  • लघु बंधारे व सिमेंट बंधारे.

  • भूजल पुनर्भरण.

  • पाणलोट क्षेत्र विकास.

2. मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा

  • ग्रामीण रस्ते व अंतर्गत सुविधा.

  • गावातील पाणी निचरा व्यवस्था.

  • सार्वजनिक मालमत्तांची निर्मिती.

  • गावाच्या मूलभूत सुविधांचा विकास.

3. उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा

  • पशुधनासाठी सुविधा.

  • शेती व सिंचनाशी संबंधित कामे.

  • वैयक्तिक लाभाची पात्र कामे.

  • ग्रामीण उपजीविका साधनांचा विकास.

4. नैसर्गिक आपत्ती व हवामान बदल प्रतिबंधक कामे

  • दुष्काळ निवारण.

  • पूर नियंत्रणाची कामे.

  • वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन.

  • नैसर्गिक आपत्तींचे परिणाम कमी करणारी कामे.